उद्योजक व्हायचय – कोषातुन बाहेर पडा


उद्योजक व्हायचयकोषातुन बाहेर पडा
get-out-of-your-comfort-zone
आज कोणत्याही व्यक्तीला त्याची इच्छा विचारली तर बहुतेक सर्वजण हेच सांगतील कि त्यांना श्रीमंत व्हायचय. गंडगंज पैसा खिश्यात असावा तो मनात येईल तसा खर्च करण्याची मुभा असावी.
पण हा पैसा मिळवण्याकरिता काय करावे लागेल हे विचारल्यावर उत्तरही नेहमीचीच मिळतात. ती म्हणजे उद्योजक, धंदेवाईक व्हायच किंवा गेला बाजार श्रीमंत ( उद्योजक ) व्यक्तीच्या घरची सोयरिक जुळवायची. थोडक्यात काय तर उद्योजक व्हायचं.
उद्योजक व्हायच तर नेमक काय करायच?, कस करायच? हे सगळ सगळ्यांना ठाउक असत. इच्छा असते. त्यावर विचारचे इमले बांधुन झालेले असतात. तरी घडत मात्र काहीच नाही, अस का बरंह्यावर मात्र फार वेगवेगळी उत्तर असतात. जसे कि,
. उद्योग करण्याची इच्छा आहे, पण पैसे नाहीत.
. कल्पना आहेत; परंतु साकारण्यासाठी सहकार्य नाही.
. आमच्यात अजुन कोणी उद्योजक झालेल नाहीतर मला जमेल का?
. घरातल्यांचा विरोध आहे.
. लोक काय म्हणतील?
. आहे ही नोकरी चांगली चालली आहे. उगाच कशाला आगीतुन फुफाट्यात. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी.
. मला लग्नाकरिता मुलगी मिळेल का?
. उद्योग फसला तर. . . .
. कोणाचा वरदहस्त (God father) नाही.
एक ना शंभर कारण मिळतील. पण खर कारण काय आहे सांगु.
कोणीही त्यांच्या  सहज-सुखद कोषा (comfort zone) तुन बाहेर पडायला घाबरतातउदाहरण म्हणुन कोणतेही कारण एक घ्याते आजुबाजुच्या परिस्थितीच्या किंवा इतिहासाच्या कसोटीवर पडताळुन पहा. लक्षात येईल कि हि तर फक्त नाटक आहेत सहज-सुखद कोष  सोडण्याची.
काय पटत नाही मी म्हणतोय ते. आपण एकेक कारण पडताळुन पाहु.
. उद्योग करण्याची इच्छा आहे, पण पैसे नाहीत. – मध्यंतरी एक हिंदी चित्रपट आला होता, “बदमाश कंपनी”. त्यात एक डॉयलॉग होता, “बडे से बडा बिझनेसपैसे से नही, एक बडे आयडियासे बडा होता है।त्या सिनेमात त्यांनी ते प्रत्यक्षात कस घडु शकत ह्याचेही उदाहरण दिले आहेप्रत्यक्ष इतिहासात पहायच झाल तर कित्येक नाव घेता येतील जे पैश्याच्या नाही तर मेहनत करुन मोठे उद्योजक झालेत जसे की धीरुभाई अंबानी, विठ्ठल कामत ह्या थोर व्यक्तिंचे आत्मचरित्र वाचलेत तर लक्षात येईल कोणत्या हलाखीच्या परिस्थितीतुन, पैसे गाठिशी नसताना ह्यांनी त्यांच विश्व निर्माण केलय.
. कल्पना आहेत; परंतु साकारण्यासाठी सहकार्य नाही. – जस वरच्या उदाहरणात म्हटलय कल्पना असावी लागते आणि ती रुजवायला सुरवात करावी लागतेनुसतं घराबाहेर पडलं तरीखाण्याचे पदार्थ करून विकणेही हजारो वर्षे सार्या जगभर चावून चोथा करून जुनी झालेली कल्पना, तिची विविध रुपे, विविध ग्राहकवर्ग आपल्याला दिसतात. आणि त्या कल्पनेची बहुतेक सगळी रुपं यशस्वी उद्योग करताना दिसत आहेत.  ह्या सगळ्या कल्पना कोणीही कोणाच तरी सहकार्य मिळाल म्हणुन सुरु केलेल्या नाहीतर गरज म्हणुन सुरु केल्या आहेत. एकदा का तुम्ही तुमची संकल्पना अमंलात आणायला लागलात कि मदतीचे हात आपोआप पुढे येतात ते शोधावे लागत नाहीत. रामदास स्वामींनी म्हणूनच ठेवले आहेकेल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे“. ह्याचे प्रत्यक्ष उदाहरण खातर केएफसी (KFC) चा इतिहास पाहु . . .
केएफसी फूड चेन सुरू करून जगात नाव कमावणारे हारलँड सँडर्स सप्टेंबर १८९० रोजी इंडियानात जन्मले. बालपण कठीण परिस्थितीत गेले. सहाव्या वर्षीच पितृछत्र हरवले. आई टोमॅटो कारखान्यात काम करायची. त्यामुळे सँडर्संंना आपल्या लहान बहीण-भावांचे पालकत्व स्वीकारावे लागले. कमी वयातच सँडर्स स्वादिष्ट जेवण बनवायला शिकले.
आईने दुसरे लग्न केले. सावत्र पित्याच्या मारानंतर सँडर्स घर सोडून पळाले. काही तरी करायचे होते. १५ व्या वर्षी खोटे वय सांगून सैन्यात गेले. तेथे पूर्णवेळ काम केले. त्यानंतर स्टीमबोट पायलट, विमा प्रतिनिधी आणि शेतमजूर बनूनही नशीब अजमावले. अमेरिकन रेल्वे कंपनीत एक चांगली नोकरी मिळताच त्यांनी जोसफाइन किंगशी लग्न केले. मात्र, आदेश पाळल्यामुळे त्यांना नोकरीवरून काढण्यात आले.
त्यामुळे पत्नीही सोडून गेली. सँडर्स यांनी ४० व्या वर्षांपर्यंत रुचकर जेवण बनवण्याचा शौक अजमावून पाहिला. गॅससाठी थांबणारे प्रवासी त्यांचे गिऱ्हाईक होते. या परिसरात दुसरे हॉटेल नव्हते. लवकरच केंटुकी फ्राइड चिकन ऑफ हारलँड सँडर्स असा लौकिक झाला. १९३५ मध्ये स्थानिक पदार्थाला नावरूप दिल्यामुळे सरकारने त्यांना केंटुकी कर्नलची पदवी बहाल केली. १९५५ ला त्यांनी हॉटेल बंद केले. सर्व लक्ष व्यावसायिक चिकन फ्रँचाइझी साखळीवर केंद्रित केले.
११ मसाले आणि आपल्या खास पद्धतीने चिकन बनवण्याचा व्यवसायाचा सँडर्स यांनी करार केला. १९६४ पर्यंत अमेरिका आणि कॅनडात केएफसीच्या ६०० हून जास्त फ्रँचाइझी तयार झाल्या. अमेरिकेतल्या सर्वाधिक जुन्या साखळी उपहारगृहांपैकी ही एक आहे. १९६९ मध्ये केंटुकी फ्रायड चिकन न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये समाविष्ट झाली. व्यवसायाचा वेलू गगनावर पोहोचला.
तर हातात थोडेसे पैसे आणि कोणीही मदतीला नसताना सँडर्स यांनी सुरु केलेला उद्योग जगभर पसरला आहे म्हणुनच म्हणतो कोषातुन बाहेर पडा. जग तुमचीच वाट पहातय.
आमच्यात अजुन कोणी उद्योजक झालेल नाहीतर मला जमेल का? – कोणतेही उद्योग साम्राज्य पाहिलत तर ते कधीच कालातीत नव्हते. तसेच कोणीही पुर्वापार उद्योजक असलेल्या व्यक्तीने स्थापन केलेला नसुन एका नवख्या व्यक्तिने त्याच्या कल्पनेने, मेहनतीने त्यासाठी लागणारे कौशल्या मिळवत, येणाऱ्या चांगल्या वाईट घटनांना मात  करित घडवलेल असतो.
तुमच्याच घरातील उदाहरण पाहिलत तर तुमच्या घरातही कोणीही संगणक शिक्षित नव्हते, मोबाईल वापरणारेही नव्हते पण तुम्ही ते सर्व कुशलरित्या हाताळताय. तुमच्या कोणत्याही पुर्वजांनी हे सुख अनुभवलेले नाही पण तुम्ही त्याचा आनंद घेताय. कोणीतरी सुरवात करायची असते ती तुम्ही करा. कोषातुन बाहेर पडा.
घरातल्यांचा विरोध आहे. – हे एक असेच कारण आहे जे फक्त आणि फक्त कोषातुन बाहेर पडण्याकरिता दिलेले आहे. तुम्ही कधीच घरच्यांच्या विरोधातुन जाउन काहीही केलेले नाही काएखादी गोष्ट हवी असल्यास तुम्ही कधीही आई-वडिलांकडे हट़्ट केलाच नाही कातुम्ही केलाच असणार आणि तो कित्येकदा पुरवलाही गेला असेलतुम्ही जेंव्हा एखादी ईच्छा घरी बोलुन दाखवता त्यामागचं नियोजन सांगता त्यावेळी विरोध होता, तुमच्या घरचे तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात प्रसंगी मदतही करतात.
लोक काय म्हणतील? – किशोरकुमार यांनी गायलेल अमरप्रेम मधील एक गाण आहे
                                     “कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना
                                      छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना 
                                      कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना
तर लोक काय म्हणतील ह्याची काळजी करण्यापेक्षा लोकांनी काय म्हणाव हे तुमच्या कर्तुत्वाने ठणकावुन सांगु देतुम्ही तुमच्या कोषातुन बाहेर पडु नये, तुम्ही आहात तिथेच त्यांच्या सोबत रहाव या करिता लोक काहिना काही तरी बोलत असतात. त्याची काळजी करत, ऐकत बसलात तर आहात तिथेच रहाण्यापेक्षा वेगळा मार्ग तुमच्याकडे शिल्लकच राहत नाही. तर तोडा सर्व कोष आणि बाहेर पडा.
आहे ही नोकरी चांगली चालली आहे. उगाच कशाला आगीतुन फुफाट्यातअसेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी – हे कारण म्हणजे सरळ सरळ मला आहे त्या परिस्थितीतुन बाहेर पडायचे नसुन आहे त्यात मी सुखी आहे अस घेतलेला पवित्रा. उगाच मी माझा सुखाचा जीव खड्यात का घालु? हा आक्षेप करणारा आहे. पण हाही साफ खोटा अन कातडी बचाऊ आहे. हे मी सिध्दही करु शकतो, त्या करिता एक गोष्ट वाचा. . .
पावसाळ्याचे दिवस असतात. हरिपूर गावात पूर येतो. लोकं गाव सोडून जायला सुरुवात करतात. तिथल्या मंदिरातील पुजारीबुवांनाही ते आपल्यासोबत येण्यासाठी सांगतात. पण पुजारी बुवा काही त्यांचं ऐकत नाहीत. ते म्हणतात, ‘माझा देवावर विश्वास आहे. तो नक्की माझं रक्षण करेल.’
हळूहळू पाणी वाढू लागतं. अख्या गावभर पाणी पसरतं. मंदिराजवळही येतं. तिथेच पुजाऱ्याचं घर असंत. पट्टीचा पोहोणारा एक माणूस तिथून पोहत जात असतो. तो पुजारी बुवांना म्हणतो, चला बुवा, आता या पूरात गाव वाहून जातोय. तुम्ही माझ्या पाठीवरून चला. मी तुम्हाला नेतो. पण पुजारी बुवा नकार देतात. ते त्याला सांगतात. ‘माझा देवावर विश्वास आहे. तो नक्की माझं रक्षण करेल.’
थोड्यावेळाने शेजारच्या गावातली काही माणसं एक होडी घेऊन येतात. पण पुजारी त्यातही बसत नाहीत. मग सरकारकडून हेलिकॉप्टर येतं. पण पुजारी केवळ देवाची वाट पाहत बसून राहतात. ते त्या हेलिकॉप्टरमधूनही जात नाही.
आता मात्र पुराचं पाणी अगदी गळ्यापर्यंत येतं. पुजारी घराच्या टोकावर जाऊन बसतात. पण तिथेही पाणी पोहोचतंच. पुजारीबुवांना जलसमाधी मिळते. ते स्वर्गात जातात. तिथे देव दिसतो. देवाला भेटल्याभेटल्या ते त्याच्याकडे तक्रार करतात, ‘काय रे देवा, मी तुझा एवढा परमभक्त पण तू मला वाचवायला आला नाहीस.’ त्यावर देव हसू लागतो. पुजारीबुवांना काही कळत नाही. ते म्हणतात, अरे देवा हसतोस का? ते तरी सांग. देव त्याला म्हणतो, माझ्या प्रिय भक्ता, मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलिकॉप्टरही पाठवलं होतं पण तू मात्र त्या संधींचा फायदाच घेतला नाहीस. नुसताचअसेल माझा हरी तर देईल खाटल्यावरीअसं म्हणत हट्टाने बसून राहिलास. मग मी तरी काय करणार? आता पुजाऱ्याला आपली चूक कळली.
असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी हा पवित्रा सोडायला हवाआपल्या मनाने विचारात गुरफटलेल्या कोषाला तोडुन टाकायला हव.
मला लग्नाकरिता मुलगी मिळेल का? – हे कारण म्हणजे एक तकलादु ढाल आहे. आजवर जेवढे उद्योजक आहेत ते अविवाहित राहिलेत का? त्यांच्या मुलांची लग्न झालीत नाहित कापण मानसिक बंधनातुन बाहेर पडायला तयार नसलेल्या मनाचे हे चोचले आहेतउलट ह्या उद्योजकांचे रंगीलेपणाचे किस्से मोठ्या चवीने चघळताना पहायला मिळते.
उद्योग फसला तर. . . .– कच खाऊ मानसिकतेच्या लोकांची हि कारणे आहेतहि गोष्ट ऐका म्हणजे पटेल.
एक शिकारी असतो. तो शिकारीला जाण्यासाठी तयारी करीत होता. त्याच्या मुलाने ते पाहिल आणि त्याने वडिलांना विचारलं की बाबा शिकारीला चाललात का?
शिकारी : हो, मी वाघाची शिकार करायला चाललोय.
मुलगा : पण बाबा वाघाने तुमच्यावर झडप मारली तर.
शिकारी : अरे माझ्याकडे बंदुक आहे त्यातून गोळी झाडीन.
मुलगा : पण बंदुकीतुन गोळीच सुटली नाहीतर?
शिकारी: अरे मी सर्व्हिसींग केली आहे. गोळी सुटणार नाही असे होणारच नाही.
मुलगा : तरीपण समजा नेम चुकला तर.
शिकारी : मी रोज बंदुकीने नेम मारण्याचा सराव करतो.
मुलगा : तरी वाघाने गोळी चुकवली तर.
शिकारी : माझ्याकडे अजूनही भरपूर गोळ्या आहेत.
मुलगा : त्याही सर्व गोळ्या संपल्यातर.
शिकारी : मी मोठ्या झाडावर चढेन.
मुलगा : तो वाघपण झाडावर चढला तर.
शिकारीमाझ्याकडे धारदार चाकुही आहे. तो जवळ आला तर चाकुने त्याला जखमी करुन माझा प्राण वाचवेन.

गोष्ट इथे संपते पण. . . .
हापणसर्व नकारात्मक विचारांचा सर्वोच्च नेता आहे. काळजी, चिंता असावी. त्यामुळे आपण येणाऱ्या संकटापासुन बचाव करण्याकरिता उपाययोजना करतो. आपण किती ही काळजी, खबरदारी घेतली. तरीही .०००००००००१% शक्यता अपयशाची असतेच. आपण फक्त अपयशाची वारंवारता कमी करतो; हा शक्यतेचा(Probability) सिध्दांतच आहे. पण जर तुम्ही प्रयत्नच केला नाहीत तर मात्र तुम्हाला चुकुन मिळु शकणार यशही मिळणार नाही हे नक्की.
कोणाचा वरदहस्त (Godfather) नाही. : स्वप्ने असोत की वास्तव, त्यांचा अभ्यास करणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, अर्थसाहाय्य ठरवणे आणि संबंधित उद्योग उभारणीपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे अशी सर्व कामे आपली आपल्यालाच करावी लागतातगरज असेल तर व्यवसायातील उपलब्धी, बदलत्या संकल्पना संधी, आर्थिक पर्याय या संदर्भात योग्य माहिती आणि सल्ला देणारे मार्गदर्शक व्यक्ती, संस्था कार्यरत आहेत, त्यांची मदत ह्या करिता घेता येते.
वरिल मुद्दा क्रमांक दोन नुसार जेंव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट करायला सुरवात करता, कालौघात तुम्हाला असंख्य मदतीचे हात पुढे येतात. त्यातील काहीजण त्यांचा पुर्ण ताकत तुमच्यासठी उभी करतात. जे तुमचे वरदहस्त(God father) अस्तात. हे घडते जेंव्हा तुम्ही उद्योगाला सुरवात करता, तो चांगल्या प्रकारे उभारता. सुरवात करण्याअगोदर कोणीही मदतीस येणार नाही हे पक्के करुन सुरवात तर कराकोणीतरी म्हटलच आहे. . . .
                                                               निकले तो थे हम अकेले हीं राह- -मंजिल की तलाश में,
                                                               मगर लोग जुडते गए और कारवाँ बनता गया ……..
नावीन्य, कार्यक्षमता, उच्च कोटीचं कर्तृत्व हे आज यशस्वी उद्योजकासाठी परवलीचे शब्द ठरले आहेत. काहीतरी उद्योग करणं वेगळं आणि तो धडाडीने कार्यकुशलतेने करणं वेगळं. यासाठी तुमच्यातील प्रेरणा महत्त्वाच्या ठरतातउद्योजक होण्याचे मोठे स्वप्न बाळगा. बाजारपेठेची मागणी आणि आपला कल लक्षात घेऊन उद्योजक व्हा. मात्र, त्यासाठी ज्ञान, प्रामाणिकपणा, एकाग्रता आणि तंत्रज्ञानाची माहिती या गुणांची गरज आहेउद्योजकतेवर आता कुणाची मक्तेदारी राहिली नाही. कोणत्याही विद्याशाखेतील विद्यार्थी उद्योगांकडे वळू शकतात. संघर्ष जीवनात अटळ आहे. त्यामुळे उद्योग सुरू करतानाही धोका पत्करावा लागतो. ती तयारी ठेवावीमराठी समाजात आजही नोकरी श्रेष्ठ मानली जाते. परिणामी मराठी माणूस आणि समाज इतर समाजाच्या तुलनेत मागे पडला. आता वेळ आहे मराठी माणसांनो उद्योजक व्हा.